| Kolhapur


मा. केमिस्ट हृदय सम्राट आमदार जगन्नाथ उर्फ अप्पासाहेब शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली कोल्हापुर जिल्हा केमिस्ट असोसिएशन मार्फत  मोफत कोविड केअर सेंटर कोल्हापुर जिल्हा केमिस्ट असोसिएशन ,व्हाईट आर्मी, कोल्हापुर मेडिकल असोसिएशन, दिगंबर जैन बोर्डीग यांचे माध्यमातून कोल्हापुर जिल्हातील सर्व केमिस्ट सभासद बंधू व त्याचे कुटुंबीयां साठी मोफत कोविड केअर सेंटर सुरवात दिगंबर जैन बोर्डीग दसरा चौक कोल्हापुर येथे करण्यात येणार आहे.


दिगंबर जैन बोर्डीग कोल्हापुर येथे सुरू असलेल्या कोविड केअर सेंटर ला आज मदन पाटील संघटन सचीव एम एस सी डी ए, संजय शेटे अध्यक्ष, प्रल्हाद खवरे उपाध्यक्ष,शिवाजी ढेंगे सचीव,भुजिंगराव भांडवले यांनी भेट देऊन पाहणी केली .व व्हाईट आर्मी चे अशोक रोकडे यांचे बरोबर चर्चा करून दिगंबर जैन बोर्डीग मधील १० नवीन रुम तयार करून त्या केमिस्ट सभासद बंधू व त्याचे कुटुंबीयां साठी आरक्षित केल्या. नवीन रुम तयार करण्याचे काम सुरू आहे त्या मध्ये ४ बेड ऑक्सीजन सह असणार आहेत. या मध्ये गरज भासल्यास जादा बेडची व ऑक्सीजन बेडची सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे.

या मध्ये कोल्हापुर मेडिकल असोसिएशनच्या डाॅक्टर मार्फत तपासणी,औषध उपचार,समुपदेशन केले जाणार आहे. पिण्यासाठी गरम पाणी,सर्व औषध, दोन वेळचा नाष्टा,जेवण दिले जाणार आहे. लक्षणे दिसू लागताच तसेच प्राथमिक स्वरूपात वेळ न दवडता संपर्क साधावा व आपली व आपल्या कुटुंबीयांची काळजी घ्यावी.तसेच जिल्हातील कोरोना बाधीत केमिस्ट सभासद बंधुनी त्वरीत संपर्क करावा व आपली व आपल्या कुटुंबीयांची काळजी घ्यावी.