मा,जगन्नाथजी शिंदे नेहमीच जिल्ह्यातील केमिस्ट बांधवांच्या पाठीशी ठामपणे उभे राहतात - उन्मेष शिंदे

  • 03 Mar 2022

मा जगन्नाथजी शिंदे यांनी स्वतः चिपळूणमध्ये येऊन पाहणी केली, आणि पूरग्रस्त केमिस्टची संवाद साधून फर्निचर व औषधी साठा याच नुकसान कास टाळता येईल याच मार्गदर्शन केलं, एज्युकेशनल अँड वेलफेर ट्रस्ट महाराष्ट्र केमिस्ट ड्रगीस्ट असो तर्फे  चिपळूण मधील पूरग्रस्त केमिस्ट बांधवांसाठी कॉम्पुटर आणि फ्रीज या साहित्याचे वाटप करण्याचा निर्णय घेऊन दोन कोटी मूल्याचे साहित्य वाटप केले गेले.
ब्राम्हण सहाय्यक संघ चिपळूण येथे संपन्न झालेल्या हा कार्यक्रम मा,ना.उदयजी सामंत उच्च तंत्र व शिक्षण मंत्री, यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. या वेळी माजी आमदार डॉ विनय नातू आमदार श्री शेखर निकम हे देखील उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्तविक वैजनाथ जागुष्टे यांनी केले . 
श्री सामंत निव्वळ या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिले,आपल्या मनोगतामध्ये त्यांनी संघटनेच्या कामाचे कौतुक करताना  राज्यातील, जिल्हयातील,केमिस्ट बांधव वर्गणी काढून जी मदत करीत आहेत,ती नक्कीच उल्लेखनीयआहे,संकटात सापडलेल्या केमिस्ट बांधवाना आधार देत आहेत,तसेच संघटने तर्फे जिल्ह्यातून जी तातडीची मदत केली गेली त्याचाही आवर्जून उल्लेख त्यांनी यावेळी केला राज्य संघटनेचे अध्यक्ष जगन्नाथजी शिंदे यांनी संघटने मार्फत चिपळूण पूरग्रस्त केमिस्ट बांधवांसाठी करीत असलेल्या कामाचे कौतुक केले यावेळी फार्मसी काऊन्सिलचे अध्यक्ष विजय पाटील, राज्यसंघटनेचे खजिनदार वैजनाथ जागुष्टे,संघटक सचिव मदन पाटील,जिल्हा संघटनेचे अध्यक्ष उन्मेष शिंदे,नंदू गोंधळी, हेमंत भाट, उपस्थित होते.
मागील लॉकडाऊन मध्ये पुणा,मुंबईतून औषधे सप्लायचा झालेला गुंता,जिल्हाअंतर्गत औषध पुरवठा सुरळीत करण्यात मोलाचा वाटा, तसेच असो व सर्व केमिस्ट बांधव आणि कर्मचारी यांचे लसीकरण या सर्वच वेळी सामंत साहेबांनी तातडीने मदत केल्याबद्दल जिल्हा केमिस्ट असोसिएशन तर्फे त्यांचे आभार मानण्यात आले